माझ्या कायम आठवणीत राहिलेला, भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन
आत गेलो. आजोबा बिछान्यावर बसले होते, त्यांच्या समोर बसलो. आज त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान होतं. ते बोलायला लागले, “आम्ही तरुण असल्यापासून आम्हाला जमेल तसा स्वातंत्र्याच्या चळवळीत आम्ही भाग घेतला. आम्हाला कधी अशी खात्री वाटली नव्हती की, आमच्या आयुष्यात स्वातंत्र्य मिळेल म्हणून. पण आज आपण प्रत्यक्ष स्वतंत्र झालो आहोत. फ्रेंचक्रांतीसारखीच ही जगाच्या इतिहासातली एक महत्त्वाची घटना आहे.”.......